Orange Kheer - संत्र्याची खीर

ऐकायला थोडीशी वेगळी असेलेली संत्र्याची खीर, चवीला मात्र एकदम मस्त लागते. संत्र्याच्या मोसमामध्ये आपण एकतर नुसती संत्री तरी खातो किंवा त्याचे ज्यूस बनवून पितो.

खाली दिलेली संत्र्याची खीर खरच खूप छान लागते. एकदा बनवून बघा आणि मला तुमचा अनुभव सांगा.


लागणारा वेळ : ३० मिनिटे
जणांसाठी : २

साहित्य :
  • १ लिटर सायीचे दुध 
  • २ -३ संत्री 
  • १/२ चमचा वेलची पावडर
  • केशर 
  • ४ चमचे साखर 
  • सुकामेवा, बारीक-पातळ काप करून 

कृती:
१. संत्र्याची साले काढून, त्यांचे बारीक काप करून घ्या.
२. कापतानाच संत्र्यातील बिया काढून टाका. हे काप बाजूला झाकून ठेवा.
३. कढईत दुध उकळायला ठेवा. चमच्याने सतत हलवत राहा म्हणजे दुधाला जाडसरपणा येईल. दुध आधी होते त्यापेक्षा अर्धे होईपर्यंत उकळून घ्या.
४. कढई gas वरून बाजूल काढून, दुध गार होऊ द्या.
५. आता दुधात साखर, वेलची पावडर आणि सुकामेवा घाला. नीट मिक्स करा.
६. आता संत्र्याचे काप आणि केशर घालून एकजीव करून घ्या.
७. साधारण २ तास फ्रीज मध्ये ठेऊन द्या.
८. थंडगार खायला द्या.
Print Friendly and PDF

Mejwani   © 2008. Template Recipes by Emporium Digital

TOP